परभणीत शिवाई बसच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

शेती-हवामान  2026-11-22 07:38

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शनिवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई बसच्या मागील चाकाखाली सापडून ७४ वर्षीय बापूराव तुळशीराम निर्वळ (रा. धर्मापुरी, ता. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले ७२ वर्षीय शंकर डोंबे गंभीर जखमी झाले. दोघे शनिवारी पगाराचे पैसे घेण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आले होते. भर चौकात घडलेल्या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. तपशीलासाठी लिंक पाहा.

स्रोत

ही बातमी खालील प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारित आहे. सविस्तर वृत्तासाठी मूळ स्रोत पाहा.